मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना समन्स पाठवण्यात आलेत. तसेच EDकडून लवकरच चार्जशीट दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अमीर मलिक आणि फराज मलिक यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. दोन्ही मुलांना ईडीने अनेकदा समन्स बजावल्यानंतरही दोन्ही मुले चौकशीसाठी हजर झाली नाहीत.
फराज मलिकला ईडीने 3 वेळा, अमीर मलिकला दोनदा समन्स बजावले होते. नवाब मलिक (Nawab Malik) यांचा मुलगा फराज मलिक (Faraz Malik) याला 15 मार्च रोजी समन्स बजावले होते.
दरम्यान, ईडीकडून नवाब मलिक यांच्याविरोधात मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाचा तपास सुरु केलाय. ईडीने फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगसोबत मलिक यांचं कनेक्शन असल्याचा ईडीचा आरोप आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात तात्काळ सुटकेसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आज त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी नवाब मलिक यांचा संबंध असल्याचं ईडीला तपासात आढळलं आहे. त्यानुसार ईडीने कारवाई करत नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली.
महत्त्वाच्या बातम्या-
“केंद्र सरकारनं अख्खा देश उद्योगपतींना विकला”
‘पाच कोटी द्या, अन्यथा…’; धनंजय मुंडेंना महिलेची धमकी
“देशाच्या संविधानावर बुलडोजर चालवला जातोय”
दिल्लीच्या फिरकीपुढे पंजाबच्या फलंदाजांचे लोटांगण; 9 गडी राखत दणक्यात विजय