सर्वात मोठी बातमी! ईडीचा शिवसेनेला दुसरा झटका; ‘या’ नेत्याची संपत्ती जप्त

मुंबई | ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाखांची संपत्ती जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला सलग दुसरा धक्का बसला आहे.

ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची 11.36 कोटी रुपयांची संपत्ती केली आहे. यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि जमिनींचा समावेश असल्याचं कळतंय.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी केली होती.

मध्यंतरी हा तपास थंडावला होता. मात्र आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त करत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.

प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

एनएसईएल घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईत गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आता ईडीने सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर आणखी एक गंभीर आरोप 

…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं! 

सावधान! Omicron BA.2 व्हेरिअंटची दोन लक्षणं आली समोर, दिसताच डॉक्टरांकडे जा 

‘बायकोने ऑफिसमध्ये फोन करून चौकशी केली तर….’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय