नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न केले जातायेत – नारायण राणे

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 नगर पंचायती आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नारायण राणे (Narayan rane) यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.

ज्यांच्या नेतृत्वाखालील बँकेत सतीश सावंत काम करत होते ते काय काय काम सांगत होते हे जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका अजित पवारांनी केली होती.

त्यानंतर कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील सडकून टीका केली आहे.

4 नगर पंचायती आणि जिल्हा बँकेवर आता भाजपची सत्ता येणार असल्याचं महाविकास आघाडीच्या लक्षात येताच त्यांनी सुड भावनेने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

कणकवलीमध्ये घडलेल्या मारहाणीमध्ये आमदार नितेश राणे यांना गोवण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा गैरवापर केला जातोय. नितेश राणे आणि माजी जिल्हा अध्यक्ष संदेश सावंत यांना अटकेचा प्रयत्न केला जातोय, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

पोलसांनी लक्षात ठेवावं केंद्रात आमची सत्ता आहे. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने वागू नये नाहीतर आम्ही मोर्चा काढू, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, त्यांनी 13 कोटी मागितले होते पण त्यातले 6 कोटी घेऊन आले. त्यांना अर्थसंकल्प म्हणजेच बजेटचा अर्थ समजतो का?, असा सवाल देखील नारायण राणे यांनी अजित पवारांना विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विधानसभेत कोरोनाचा शिरकाव! अधिवेशनातील ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

येत्या 3 दिवसात मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेश निवडणुकीआधी प्रियंका गांधींनी दिला ‘हा’ नारा

“सनी लिओनीचा ‘तो’ व्हिडीओ 3 दिवसात हटवा”, गृहमंत्र्यांचा अल्टीमेटम

अभिमानास्पद! युवराज सिंगची ‘ती’ खास बॅट अंतराळात पोहोचली; पाहा व्हिडीओ