Top news देश

चक्क फॉर्च्युनर गाडीमधून विकत होता वांगी; पाहा व्हायरल व्हिडीओ

Photo Credit - Nikhil Rana / YouTube

मुंबई| सोशल मीडियावर आपल्याला रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात. अशा व्हिडीओला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत असते.

अशातच महाराष्ट्रातील एक शेतकरी 31 लाखांच्या फॉर्च्युनर गाडीमधून वांगे विकत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आतापर्यंत आपण रस्त्यावर फळे-भाज्या विकताना अनेक गाड्या पाहिल्या असतील, पण चक्क 31 लाखांच्या नव्याकोऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमधून भाजीविक्री करत असल्याचा प्रकार शिरगावातून समोर आला आहे.

आतापर्यंत अनेकदा गाड्यांमधून विविध वस्तूंची विक्री केली जात असल्याचे आपण पाहिले असेल, मात्र चकचकीत फॉर्च्युनरमधून भाजी विकताना पहिल्यांदाच पाहिलं असेल. हा व्हिडिओ शिरगावातील आहे. ही फॉर्च्युनर कार एका डॉक्टरांची असून त्यांनी हा गाडी भाजी विकण्यासाठी त्या व्यक्तीकडे दिल्याचे व्हिडिओमधून सांगितले जात आहे.

31 लाख रुपयांच्या गाडीमध्ये भाजीपाला विक्री करत असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तसेच काही लोक या गाडी जवळ उभे राहून भाजी खरेदी करताना देखील पाहायला मिळत आहेत.

या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांकडून हा व्हिडीओ लाईकही केल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या – 

75 वर्षाच्या आजीनं लग्नात केला खतरनाक डान्स, पाहा व्हायरल…

सलमानच्या ‘सीटी मार’ या गाण्यावर डाॅक्टरांनी केला भन्नाट…

कोरोना होऊनही रुग्णालयातील फरशी साफ करताना दिसले…

हेअरकट आवडला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलानं लावला पोलिसांना…

नागीन डान्स करुन कोरोनावर करत होता उपचार; पोलिसांनी अशा…