मुंबई | आपल्याला माहित आहे की, प्रत्येकाला कोणताना कोणता छंद हा असतोच. कोणाला डान्स करायला आवडतो. तर कोणाला गाणं गायला आवडतं. परंतू या जगात असा एकही व्यक्ती आढळणार नाही की, ज्याला काहीच करायला आवडत नाही. सगळ्यांनाच काहीना काही आगळं-वेगळं करायला आवडतंच असतं.
त्यातील बऱ्याच जणांना फिशिंग म्हणजेच पाण्यातील मासे पकडण्याची फार आवड असते. आपल्या सगळ्यांना हेही माहित असेल की, सध्याचं जग खुफ स्पर्धात्मक झालं आहे. त्यामुळे दररोज रेसमध्ये धावल्यासारखा माणूस धावत असतो. यासगळ्यातून काही वेळ रिलॅक्स होण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स, उपाय वापरले जातात.
काहीजण तर आपला हा छंद जोपासण्यासाठी दैनंदिन कामामधून रजा घेतात आणि लांब निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपल्या आवडणाऱ्या गोष्टी करतात.
आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्का देणारे असतात.
तसेच या पूर्वी कधी तुम्ही मासे पकडतानाचा व्हिडीओ पाहिला आहे का. बऱ्याच जणांनी पाहिला असेल, कारण कोळी लोकांचा हा मुख्य व्यवसाय म्हणून ओळखला जातो. परंतू मासे पकडताना याआधी नसेल पाहिलं तर आता पाहू शकता. कारण सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक तरूणाला मासे पकडता-पकडता चक्क मासाच नदीमध्ये खेचून घेतो. सुरूवातीला तरूण एका नदीच्या किनारी असलेल्या एका झाडाच्या फांदीवर बसला आहे. तो त्या नदीमधील पाण्यात मासे आहेत की नाही, हे पाहतं असल्याचं व्हिडीओमधून समजतं आहे.
त्यानंतर तो मासे पकडण्याचं साधन घेऊन येतो आणि मासे पकडायला सुरूवात करतो. मात्र काही वेळानंतर त्याच्या जाळ्यात एक मोठा मासा येतो. तो तरूण त्या माशाला जमिनीवर नदी किनारी आणण्याचा प्रयत्न करतो. परंतू मासा मोठा असल्यामुळे तो तरूणाकडून खेचला जात नव्हात.
काही वेळानंतर अचानक पाण्यातील माशाने त्या तरूणालाच आपल्या सोबत नदीमध्ये खेचून घेतो. हे सगळं अचानक घडल्यामुळे त्या तरूणाला काही सुधारत नाही आणि त्याचा तोल जातो आणि तो पाण्यामध्ये पडतो.
महत्वाच्या बातम्या-
‘आता तो माझ्या आसपास नाही परंतु…’; ‘त्याच्या’ आठवणीत मलायकाला अश्रू अनावर
ट्विंकलने पोस्ट शेअर केली अन् राखी भावूक झाली, वाचा काय आहे नेमकं प्रकरण
…म्हणून करीनाला सैफकडून नव्हे तर ‘अशा’ पद्धतीने मूल हवं होतं
सायरा बानोंची तब्येत खालावली, आयसीयुमध्ये उपचार सुरू
चक्क घरात शिरला बिबट्या अन्…, हलक्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहु नका