‘यांच्या बापजाद्याने कधी 50 कोटी पाहिले नसतील’; खडसे बंडखोरांवर बरसले

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केले आणि सेनेचे 40 आमदार यशस्वीरित्या पळवले. त्यानंतर ते गुवाहाटी आणि सूरतला त्यांना घेऊन गेले. त्यावेळी त्यांच्या बंडामागे भाजप (BJP) असल्याचे म्हटले जात होते.

भाजपने मात्र या गोष्टीला त्यावेळी नकार दिला होता आणि हे शिवसेनेचे अंतरीम बंड असल्याचे म्हंटले होते. परंतु नंतर जेव्हा भाजपने आणि एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले, तेव्हा यामागे भाजप असल्याचे सर्वांना कळून चुकले.

त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटावर सडकून टीका केली. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी टीका केली आहे.

बंडखोरीसाठी या 40 आमदारांना प्रत्येकी 50 कोटी (50 Crore) देण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी केला होता. याच दाव्यावर आता एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.

यांच्या बापजाद्याने कधी 50 कोटी पाहिले नसतील. तुम्हाला काय हाटेल, काय झाडी, काय बघायचे आहे ते बघा. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडू नका, असे म्हणत शिंदे सरकारकडून लोकशाहीची टिंगल सुरु असल्याचे खडसे यावेळी म्हणाले.

मुक्ताईनगर येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मेळावा पार पडला. यावेळी खडसे बोलत होते. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यावर आता महिना लोटला तरी अद्याप यांचा मंत्रिमंडळ विस्तार नाही, असे खडसे म्हणाले.

एक मुख्यमंत्री दुसरा बिनखात्याचा उपमुख्यमंत्री असे म्हणत खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गेले 37 दिवस सरकारचा पोरखेळ सुरु आहे, असे देखील खडसे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, तुम्ही…’; शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीला प्रश्न

“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”