Top news जळगाव महाराष्ट्र

काँग्रेसकडून मला सहाव्या जागेची ऑफर होती, भाजप आमदारही क्रॉस वोटिंग करणार होते- एकनाथ खडसे

जळगाव – भाजपचे जेष्ठ  नेते एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यापासून ते अनेक गौप्यस्फोट करत आहेत. अशातच त्यांनी काल एक नवीनच गौप्यस्फोट केलाआहे.  प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की कॉंग्रेसकडून मला सहाव्या जागेची ऑफर आलेली पण ती मी नाकारली ऐवढच नव्हे तर भाजपचे काही आमदार सुध्दा क्रॉस वोटींग करणार होते असही ते म्हणाले.

भाजपने आम्हाला उमेदवारी दिली नाही. याच दुख: नाही पण ज्या लोकांना उमेदवारी दिली आहे तेच लोक भाजपला मतदान करु नका म्हणत होते, भाजपाला शिव्या देत होते, अशा लोकांना उमेदवारी द्यायला नको होती असही ते म्हणाले.

एकनाथ खडसे भाजपचे जेष्ठ तसेच नाराच नेते आहेत. काही दिवसांपासून ते नाराज असल्याच दिसत आहेत. वारंवार भाजपला घरचा आहेरसुध्दा त्यांनी दिला आहे. अशातच त्यांनी कॉंग्रेसकडून विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी ऑफर आलेली. भाजपचे आमदारही मला क्रॉस वोटींग करणार होते. काही आमदार माझ्या संपर्कात होते असही ते म्हणाले.. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधान आलं आहे..

दरम्यान, विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक असतानाही उमेदवारी डावलल्याने एकनाथ खडसे खवळले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत योग्य व्यक्तींना उमेदवारी न मिळाल्याने एकनाथ खडसे यांची नाराजी उघड झाली होती. एकनाथ खडसे यांना विविध पक्षांकडून पुन्हा ऑफर येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पक्षांतर करण्याची शक्यता बळावली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“चुकीची माहिती दिली म्हणून मंत्री अनिल परब यांना अटक होणार का?”

-केंद्राने महाराष्ट्राचा GST परतावा द्यावा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मागणी

-सॅमसंगने ‘ती’ ऑफर 17 मेपर्यंत वाढवली; एसी, फ्रिज-टीव्हीवर मिळणार कॅशबॅक

-अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

-राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?