मुंबई | जे यशाचं श्रेय घेतात, त्यांनी पराभवाचं पण घ्यावं, ज्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी ती जबाबदारी घ्यावी, असं मत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे. माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटींनंतर खडसे माध्यमांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माजी शिक्षणमंत्री विनोद तावडेंची भेट घेऊन खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.
ठाकरे सरकारच्या कामगिरीवर प्रश्न विचारला असता, कोणत्याही सरकारच्या किंवा विरोधकांच्या कामकाजाचं केवळ 8 दिवसात मोजमाप करता येणार नाही, असं खडसे म्हणाले. सोबतच त्यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरेंचं आणि विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेल्या देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं.
बहुजन नेतृत्त्वाला डावलणं हे दुर्दैवाने घडलं आहे. त्यांना तिकीटं न देणं किंवा तिकीट दिल्यानंतर निवडणुकीत त्यांचा पराभव करणे असं हे घडलं आहे. 105 जण निवडून आले, पण जर नीट नियोजन केलं असतं तर भाजपचे आणखी आमदार निवडून आले असते, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर जायला वेळ नाही; भाजप नेत्याचं टीकास्त्र – https://t.co/LQ1UWaxyfH @BhaiGirkar @OfficeofUT @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019
मुख्यमंत्र्यांच्या आवडी-निवडी जपण्यासाठी रश्मी ठाकरे करणार ‘वर्षा’ बंगल्याची पाहणी! – https://t.co/DINwZkh2We @OfficeofUT @RashmiThackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019
पंकजा मुंडेंचं भाजपमध्ये खच्चीकरण होतंय, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा; ‘या’ भाजपच्या माजी आमदाराचा सल्ला – https://t.co/1zsLKLjnTP @Pankajamunde @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019