भाजप नेते हरिभाऊ जावळेंच्या निधनाबद्दल एकनाथ खडसेंचा धक्कादायक गौप्यस्फोट

जळगाव |  भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं मंगळवारी कोरोनामुळे निधन झालं आहे. बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

हरिभाऊ जावळे यांना ज्या प्रकारच्या इंजेक्शनची गरज होती, ते इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. ते मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्र टाईम्स’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

यासंबंधी रुग्णालय प्रशासनानं ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडे 12 जूनता विनंतीही केली होती. त्यानंतर 14 तारखेला म्हणजेच रविवारी पहिले दोन डोस आले. सोमवारी 3 आणि मंगळवारी 2 असे  7 इंजेक्शन उपलब्ध झाले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. इंजेक्शनचा कोर्स वेळेवर सुरू झाला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. परंतु नियतीला ते मान्य नव्हते, असं खडसे म्हणाले.

आम्ही यासदंर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोललो होतो. त्यांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.  त्यांच्या सूचनेनुसार सरकारी अधिकाऱ्यांनी जावळे यांना हव्या असलेल्या औषधांसाठी आवश्यक प्रक्रिया वेगानं पूर्ण केली होती. मात्र, आमचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले, असं खडसे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ चार जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

-या संकट काळात काँग्रेस पक्ष सरकारला पूर्णपणे सहकार्य करेल पण…- सोनिया गांधी

-“महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत”

-“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

-“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”