जळगाव | युती झाली अन् नाही झाली तरी मुक्ताईनगरचा सच्चा शिवसैनिक माझ्यासाठी काम करेन, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. 2014 च्या निवडणुकीला युती तोडण्याची घोषणा पक्षाच्या सर्वानुमते झाली होती मात्र त्याची घोषणा मी केली होती, असं खडसे म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.
जमीन घोटाळ्याचे एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाले आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना झोटिंग समितीने क्लिनचिट दिली मात्र खडसेंचा मंत्रिमंडळात पुन्हा प्रवेश होऊ शकला नाही. गेली साडे तीन वर्षे खडसे पक्षात एकटे पडल्याचं चित्र आहे.
भाजपची स्वबळावर सत्ता येऊ शकते. 160 हून अधिक जागा भाजपला मिळू शकतात, असा विश्वास खडसेंनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शिवसेना भाजप युती झाली तर 225 जागा नक्की मिळतील. मात्र जर नाही झाली तर मुक्ताईनगरचा सच्चा शिवसैनिक माझा प्रचार करेल, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेला निवडणुका जिंकण्यासाठी हवाय मोदींचा आधार??? – https://t.co/z8BKAnj97p @rautsanjay61 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019
मला मानसिक समाधान मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू असेल- तनुश्री दत्ता- https://t.co/rWsz84XzoE #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019
जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’मधून मोदींवर टीकेची झोड; अर्थव्यवस्था, बेरोजगारी, उद्योग यावरून मोदींना लक्ष्य https://t.co/Yr6Bmx2F8w #EconomicSlowdown
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019