विधानसभेनंतर राज्यसभेचंही तिकीट नाही; त्यावर नाथाभाऊ म्हणतात…

मुंबई |  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. एकनाथ खडसेंना राज्यसभेचं तिकीट पक्षाने दिलेलं नाहीये.

पक्ष मला राज्यसभेचं तिकीट देईल, अशी मला अपेक्षा नव्हती. पक्ष योग्य निर्णय घेत असतो, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

मला दिल्लीच्या राजकारणात रस नाही, हे मी अनेक वेळा सांगून झालं आहे. मला राज्याच्या राजकाणात अधिक रस आहे, असंही सांगायला खडसे विसरले नाहीत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना डावलून पक्षाने औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांना उमेदवारी दिलेली आहे. तर याअगोदर भाजपने राष्ट्रवादीतून आलेले उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे.

महत्वाच्या बातम्या –

ज्यांच्या नावाची चर्चा त्यांचा पत्ता कट… भाजपने दिली तिसऱ्यालाच उमेदवारी

सुपरस्टार रजनीकांत राजकारणाच्या आखाड्यात; करणार नवीन पक्षाची स्थापना

-राहुल गांधींनी पदरी पडलेल्या संधीचे वाटोळे केले; संघाचे टिकास्त्र

-स्टेट बॅंकेने घेतले तीन मोठे निर्णय; SBI मध्ये खातं असेल तर नक्की वाचा

-“फक्त आजच नाही तर 365 दिवस शिवजयंती साजरी करायला पाहिजे”