मुंबई | भाजपचे पुर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्ष आता संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीचं घडयाळ मनगटी घातलं होतं.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपवर सात्त्याने निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर देखील मोठा वाद रंगला होता.
अशातच आता एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आलं. मुख्यमंत्रिपदासाठी खान्देशावर कायम अन्याय झाला, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
मी टरबुज्या म्हणणार नाही पण माझ्या डोक्यावर आणून ठेवलाय, असं म्हणत त्यांनी घणाघाती टीका केली आहे. चाळीस वर्ष हमाली केली उभं आयुष्य पक्षासाठी घातलं, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
मी टरबुज्या म्हणणार नाही पण मी मुख्यमंत्रिपदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला आणि मला मुख्यमंत्रीपदापासून डावललं, असंही खडसेंनी यावेळी म्हटलं आहे.
मुख्यमंत्रिपदाचा अधिकार हा खान्देशाचा होता, स्वातंत्र्याला 70 वर्ष होऊन गेले मात्र खान्देशावर अन्याय करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.
दरम्यान, नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिपदाचा अधिकार असतानाही सत्तर वर्षात एकदाही संधी देण्यात आली नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
“आम्ही मराठ्यांच्या पोटचे नाही का?, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का?”
ठरलं तर! भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी ‘या’ दिग्गज खेळाडूची वर्णी
‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले
काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर