जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या व जिल्हा सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.
मुक्ताईनगरमधील चांगदेव भागात रोहिणी खडसेंच्या गाडीवर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. ही घटना रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली.
मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व रोहिणी खडसे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत होती. त्यामुळे राजकीय डावपेचातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसेंवर हल्ला झाला असला तरी मी त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं आहे.
‘हा कसला सेनेचा आमदार जो शिवसैनिक म्हणवतो’, अशी घणाघाती टीका एकनाथ खडसेंनी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांना उद्देशून केली आहे.
‘राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील आमदार झाला आणि आता स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेतो’, असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी मी ऑडिओ क्लिप जारी केल्या. ते आणि हल्ला करणारे हे एकच आहेत. हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
महिलांवर हल्ला करणारे कोण?, विनयभंग करणारे कोण? या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. महिलांवरील अन्याय कदापि सहन करणार नाही, असा इशारा देखील एकनाथ खडसेंनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे आमदार झाले. आता त्याच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय, असा आरोप खडसेंनी केला आहे.
दरम्यान, रोहिणी खडसेंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे करणार असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण
“पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत”
राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी
“वडिलांच्या खांद्यावर बसूनही अजित पवार यांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही”
…तर राज्य सरकारलाही राजकीय पावलं टाकावी लागतील- संजय राऊत