लॉकडाउननंतर एकनाथ खडसे भाजपला धक्का देणार; घेणार मोठा निर्णय?

जळगाव | विधानसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषदेचंही तिकीट नाकारलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक असतानाही उमेदवारी डावलल्याने एकनाथ खडसे खवळले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत योग्य व्यक्तींना उमेदवारी न मिळाल्याने एकनाथ खडसे यांची नाराजी उघड झाली होती.

भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह एकनाथ खडसे विचार विनिमय करणार आहेत. आपल्यावर वारंवार अन्याय होत आहे, आपल्याला बाजूला सारले जात आहे, आता तरी आपण निर्णय घ्या, अशी विनंती एकनाथ खडसे यांना कार्यकर्ते फोनवरुन करत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना विविध पक्षांकडून पुन्हा ऑफर येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पक्षांतर करण्याची शक्यता बळावली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मातृदिनी आमदार रोहित पवारांनी आईसाठी स्वत:च्या हातानं बनवला चहा

-केंद्राच्या असंवेदनशील अवस्थेमुळे स्थलांतरित मजुरांची दैन्यावस्था काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांची टीका

-…तर मी निवडणूक लढवणार नाही; उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब थोरातांना मेसेज

-मटकाकिंग रतन खत्रीचं निधन

-यापुढे ही तुमचं प्रेम असंच राहू द्या; कोरोनातून सावरल्यानंतर आव्हाडांची फेसबुक पोस्ट