Top news महाराष्ट्र मुंबई

“ज्या माणसाच्या बळावर तुम्ही उभे राहीले त्याचा अपमान करता, तुम्हाला…”

Devendra fadanvis And Eknath khadase

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. खडसेंनी ईडीच्या कारावायांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर निशाणा साधला आहे.

एका वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो की मागं ईडी लावता .मी चाळीस वर्ष तुमच्याबरोबर होतो तेव्हा चांगला होतो. आता एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की तुम्ही ईडी लावता आणि तुम्ही तारीख पे तारीख सुरु आहे, असं एकनाथ खडसे म्हणालेत.

एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपवर जळगावातील रावेर येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात भाषणात नाव न घेता टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

भाजपमध्ये काम करत असताना पक्षाच्या विस्तारासाठी गाव पातळीवर काम केलं, परिश्रम केलं, कष्ट केलं हे तुम्ही पाहिलं आहे. अनेक लोक घडवले, पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. नाथाभाऊच्या आशीर्वादनं मोठे झाले, असं खडसे म्हणाले.

कोणी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य केले, जिल्हा परिषद अध्यक्ष केले. या ठिकाणी मेहनतीनं कष्टानं माणसं उभं केली आणि घडवली. 40 वर्ष रक्ताचं पाणी करत पक्षासाठी फिरत होते. 30 वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढं पक्ष वाढत गेला. गावागावामध्ये पक्ष पोहोचला, साऱ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मेहनत आम्ही केली, असंही खडसेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, एकानाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं राजकीय वैर आजपर्यंत कुणालाही दडलं नाही, आता गिरीश महाजन यांना कोरोना झाल्यानंतर खडसेंनी महाजनांना मोक्का लागण्याच्या भितीने कोरोना झाला का हे बघा, अशी कोपरखिळी मारली होती, त्यावरून आता पुन्हा वार-पलटवार सुरू झाले आहेत.

मला ठाण्याला वेड्याच्या रुग्णालयात दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ 5 राज्यात कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर दिसणार नाही नरेंद्र मोदींचा फोटो! 

‘जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात दररोज…’; आयआयटीतील तज्ज्ञांचा मोठा दावा 

हिंदूचं घर जळालं तर मुस्लिमाचं घर थोडीच सुरक्षित राहील- योगी आदित्यनाथ 

Skin Care | दुधाचे हे फेसपॅक वापरा अन् आणि मिळवा तजेलदार त्वचा!