जळगाव | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्यांच्या राजकीय (Political) जीवनात माझी मोलाची मदत झाली होती. मात्र याचा त्यांना विसर पडला. दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगी भर के लिये बदनाम किया है, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यात माझा मोलाचा वाटा आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस मागच्या 5 टेबलच्या नंबरवर बसत होते. मीच माझ्याजवळ घेऊन फडणवीस यांना बसवलं, असं खडसे म्हणाले.
विधानसभेत वारंवार देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी मी त्यांना दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यास सर्वांचा नकार होता. मुंडे साहेबांच्या आग्रहास्तव मी त्यांना संमती दिली, तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष झाले. त्यामुळे मी मित्रत्वाचे नाते जोपासले, असंही एकनाथ खडसे म्हणालेत.
मला अभिमान आहे, की मी तरी मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत उत्तर महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणून पोहोचलो होतो. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी षडयंत्र रचलं, असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्रीपदावरून मला मागे ठेवण्यात आलं. यावरूनच एक गाणे मला एका कार्यक्रमात आठवलं. दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगीभर मुझे बदनाम किया, असं खडसे म्हणालेत.
दरम्यान, एकनाथ खडसेंनी पक्षांतर्गत राजकारण आणि हेवेदाव्यांना कंटाळून भाजप सोडत असल्याचं जाहीर केल्यापासून ते आजपर्यंत त्यांच्यात आणि फडणवीस यांच्यामध्ये छुपा कलगीतुरा सुरूच आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर
IPL 2022: सलग 5व्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला आणखी एक झटका, आता रोहित शर्माला…
‘नितीनजी, RSSचं हॉस्पिटल फक्त हिंदूंसाठीच आहे का?’; टाटांच्या प्रश्नावर गडकरी म्हणाले…
पालकानो काळजी घ्या! लहान मुलांमध्ये होतोय कोरोनाचा प्रसार
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची खुशखबर; अर्थ मंत्रालयाने केली मोठी घोषणा