“आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केलेला नाही, राजकारण असंच असतं”

जळगाव | जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने यू-टर्न घेतल्यानेच आमची कोंडी झाली, असं महाजन म्हणाले होते. त्यावर, आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केलेला नाही. राजकारण असंच असतं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री गिरीश महाजन पैसे लावतील अशी उमेदवारांना आशा होती. पण त्यांचा नाऊमेद झाला आहे. उमेदवार मात्र त्यांनी दहा कोटी लावले तर मी वीस कोटी लावेल, नाथाभाऊ बसला आहे, तुम्ही फक्त लढा असे म्हणत मी नाउमेद असणाऱ्यांना जिल्हा बँक निवडणूक लढायला लावली, असं खडसे म्हणाले.

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा बँक निवडणुकीत आमचा विश्वासघात झाल्याचा आरोप केला होता. जिल्हा निवडणूक बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून दोन बैठका झाल्या.

या बैठका यशस्वीही झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या यू-टर्नमुळे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही महाजन यांनी केला होता. त्यालाही खडसे यांनी उत्तर दिलं.

राजकारण हे असच असतं. आम्ही काही धर्मार्थ दवाखाने नाही चालवत, असा टोला एकनाथ खडसे यांनी महाजनांना लगावला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांनी 21 उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली असती का? असा सवालही त्यांनी केला.

ऐन निवडणुकीच्या काळात मी दवाखान्यात होतो. त्यावेळी भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही असा शब्द मी दिला होता, असंही एकनाथ खडसे म्हणले.

आम्ही योग्य वेळी आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात केली. त्यानंतर विजयही मिळवला आणि शब्द खरा करून दाखवला, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राजेश टोपेंनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

खळबळजनक! दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण

“मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे कमावलं ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावलं” 

सेक्स व्हिडीओ प्रकरण, भय्यू महाराज प्रकरणात धक्कादायक खुलासा 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत ICMR चं मोठं वक्तव्य!