‘ऑडिओ क्लिप जाहीर करणार’; एकनाथ खडसेंचा चंद्रकांत पाटलांना थेट इशारा

जळगाव | एकेकाळी भाजपचे (BJP) नेते असणारे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पक्षांतर्गत वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. एकनाथ खडसे यांनी आपल्यामागे ईडी लावली तर सीडी लावेन, असा इशारा दिला होता. त्यातच आता एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (ShivSena MLA Chandrakant Patil) यांच्या ड्रायव्हरची ऑडिओ क्लिप संदर्भात इशारा दिला आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार असताना मुक्ताईनगरमध्ये मात्र, शिवसेनेते आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटलांच्या ड्रायव्हरने एका महिलेशी अश्लील भाषेत संभाषण केले असून त्या ऑडिओ क्लिप्स (Audio clips) आपल्याकडे आहेत, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

एका ऑडिेओ क्लिपमध्ये महिलेच्या नवऱ्याला सदर व्यक्ती त्याच्या पत्नीला आमदाराकडे पाठवण्याचं सांगत आहे, असा धक्कादायक आरोप करत एकनाथ खडसे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

मुक्ताईनगरमध्ये सर्व दोन नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच आहेत. त्याविरोधात आम्ही तक्रार केल्यामुळे पोलीस कारवाई सुरू असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. यातूनच ते निरर्थक आरोप करत आहेत, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी केलेले सर्व आरोप चंद्रकांत पाटील यांनी फेटाळले आहेत. एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडले असून ते बेछूट आरोप करत सुटले आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना खुलं आवाहन केलं आहे. हिंमत असेल तर एकनाथ खडसेंनी ऑडिओ क्लिप जाहीर करावी आणि त्यात जर काही तथ्य आढळून आलं तर आमदारकीचा राजीनामा देईलं, असं प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.

एकनाथ खडसेंनी सीसीटीव्ही फुटेज दाखवावं, रेकॉर्ड दाखवावं, 30 वर्षे तुम्ही लोकप्रतिनिधी होता पण तुमच्यासारखा खोटा माणूस या महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी झाला नाही, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ऑडिओ क्लिप खोटी असली तर एकनाथ खडसे राजकारण सोडणार का? असा सवालही त्यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ खडसे यांच्यावर काही आरोप केले आहेत. राजकारणात आपले वाढते वर्चस्व सहन होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्याकडून आपल्याविरोधात सतत कटकारस्थान रचले जात असून आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच आपण आमदार म्हणून निवडूण आल्यापासून विविध प्रकरणी त्रास दिला जातो. आता तर थेट आमदाराला चोप देण्याची भाषा केली जात आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीला अशी भाषा केली जात असेल तर ही गुंडगिरी नाही का? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचं पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मुक्ताईनगरमध्ये वाद निर्माण झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 
“असं काही घडू नये, पण घडलंच तर…”, अजित पवारांचं मोठं वक्तव्य

‘मला संपवण्याचा कट होता, एक गाडी…’; पडळकरांचा जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप

‘… त्यासाठी डोकं आणि अक्कल लागते’; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला

“जीन्सवाल्या पोरींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत, ते…”

…म्हणून या सर्वात मोठ्या महामारीशी आपण सामना करू शकलो- नरेंद्र मोदी