Top news जळगाव महाराष्ट्र राजकारण

ईडीच्या नोटीसनंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नोटीसवर दुजोरा देत म्हणाले…

जळगाव | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू असतानाच आता राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. या वर्षाच्या शेवट म्हणजे 30 डिसेंबरला खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ईडीच्या नोटीसनंतर आज एका वृत्त वाहिनीला एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ईडीच्या नोटीसवर दुजोरा देताना एकनाथ खडसे म्हणाले की, होय मला ईडीची नोटीस मिळाली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले. ईडीची नोटीस आल्यानंतर मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहेत. लोक साहनभूती व्यक्त करत आहेत. लोकांना हे आवडत नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

तसेच लोकांना असं वाटत आहे की, हा माझ्यावर एक प्रकारचा अन्याय होत आहे. वारंवार चौकश्या होणं लोकांना आवडलेलं दिसत नाही. मात्र, काही निर्णय असतात त्या आधीन राहूनच काम करायचं असतं, असंही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर राज्यभरातून केंद्र सरकार विरोधात विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सीबीआय आणि ईडीला कोर्टात खेचण्याचा पवित्रा उचलला आहे.

दरम्यान, 2019ची विधानसभा निवडणुक झाल्यापासून भारतीय जनता पार्टीला राज्यात एकामागून एक धक्के सहन करावे लागत आहेत. 2019च्या निवडणुकीनंतर भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकत इतर पक्षात प्रवेश केले आहेत. यामुळे भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.

एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षांतर करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. एकनाथ खडसे यांच्यानंतर खानदेशातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अलीकडे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत महाभारती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपमध्ये गेलेले अनेक नेते येत्या काळात राष्ट्रवादीत  परततील, असे संकेत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिले आहेत. येत्या काळात राष्ट्रवादीत मेगा भरती होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

“इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं, आता कसं वाटतंय?”

नवीन वर्षात प्रत्येक आठवड्याला वाढणार गॅस सिलिंडरचा दर? वाचा सविस्तर

तुम्हीही सोनं खरेदी करायचा विचार करताय का? वाचा आजचा दर

कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच राजकारण तापलं! ‘या’ बड्या नेत्याने दिला सावधानतेचा ईशारा

भाजपला मोठं खिंडार! आणखी एका बड्या महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी