मुंबई | राज्यासह देशात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या माजी अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचं केलेलं फोन टॅपिंग प्रकरण गाजत आहे. परिणामी राज्यात जोरदार राजकारण पेटलं आहे.
सध्या मुंबई पोलीस या फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील या प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर राज्यात मोठा तणाव वाढला होता. अशातच आता पुर्वाश्रमीचे भाजप नेते आणि सध्या राष्ट्रवादीत असणारे एकनाथ खडसे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
एकनाथ खडसेंनी भाजप सोडताना पत्रकार परिषदेत आपल्याकडं एक सीडी असल्याचा दावा केला होता. तेव्हापासून खडसेंना सातत्यानं सीडीबाबत विचारण्यात येतं.
देवेंद्र फडणवीस यांनी सध्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून महाविकास आघाडीला घेरल्यानं सर्वांना एकनाथ खडसेंच्या सीडीची आठवण होत आहे. परिणामी खडसेंनी देखील महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
पेनड्राईव्ह प्रकरणात सत्य बाहेर येईलचं. माझ्याकडं CD आहे वेळ नव्हती सांगितली पण लवकरच बाहेर काढणार आहे, असा इशारा खडसेंनी भाजपला दिला आहे.
माझे आणि संजय राऊत यांचे फोन टॅप करण्यात आले. कुलाबा पोलीस स्थानकात याबाबत चौकशी झाली आहे. भाजपकडून हे सर्व कारस्थानं करण्यात आली आहेत, अशी टीका खडसेंनी केली आहे.
दरम्यान, दाऊदशी माझे संबंध जोडण्यात आले होते. त्या आरोपांवर नंतर काय झालं हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असं म्हणत खडसेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Holi: होळीत केसांची घ्या खास काळजी; ‘या’ पाच ट्रिक नक्की वापरुन पाहा
Russia Ukraine War: “जेव्हा इतिहास लिहिला जाईल…”, रशियाने भारताला दिलेल्या ऑफरमुळे अमेरिका नाराज
फडणवीसांच्या टीकेला विधानसभेत अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
होळी-धुळवडसाठी सरकारची नवी नियमावली जारी; वाचा काय आहेत निर्बंध
“सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा मुख्यमंत्र्यांचं…”