Top news पुणे महाराष्ट्र राजकारण

‘दगड मारुन पळून जाण्यात मर्दुमकी नाही’, सामंतांवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे संतापले

eknath shinde3 e1658388523417
Photo Credit- Facebook/ Eknath Shinde

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पुणे दौरा काल (दि. 02) दोन कारणांमुळे फार गाजला. त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या गटातील बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला करत त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या.

दुसरे कारण असे की, हडपसर येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे (Nana Bhangire) यांनी स्वखर्चाने एक उद्यान उभारले, आणि त्याला मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव दिले. मुख्यमंत्री त्या उद्यानाचे उद्घाटन करणार होते.

परंतु ऐनवेळी विरोधकांच्या टीका आणि महापालिकेच्या विरोधामुळे त्यांनी तो समारंभ रद्द करविला. त्यामुळे त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली होती. हा दौरा त्यांनी वाया जाऊ दिला नाही. त्यांनी हातोहात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे (Prakash Amte) यांची भेट घेतली. आमटेंवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरु आहेत.

उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. गाडीवर दगड मारुन पळून जाणे, ही मर्दुमकी नाही. कायदा आणि सुव्यस्था राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे. पोलीस हल्लेखोरांवर कडक कारवाई करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात कोणी भडकावू आणि चिथावणीखोर भाषणे देत असतील, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्याचे नवीन संपर्क प्रमुख बबन थोरात (Baban Thorat) यांनी बंडखोरांच्या गाड्या फोडा आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या हस्ते सत्कार मिळवा, अशी घोषणा केली होती.

त्यांच्या या आव्हानानंतर पुण्यात सामंतांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यामुळे अशी चिथावणीखोर भाषणे दिल्याने हे हल्ले होत आहेत, असे आमदार तानाजी सावंत म्हणाले. तसेच आठ दिवसांत या हल्ल्याची हल्लेखोरांना रिअ‌ॅक्शन मिळेल, असे देखील सावंत म्हणाले.

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे (Sanjay More) यांच्यासह अन्य पाच जणांना अटक केली आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

हल्ल्यानंतर उदय सामंत आक्रमक, ट्विट करत म्हणाले….

उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, नवा वाद पेटणार?

“कोरोना लसीकरण मोहीम संपल्यावर लगेच CAA लागू करणार…”

अजित पवारांनी उडवली शिंदे सरकारची खिल्ली, म्हणाले…

टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल; आता ‘हे’ नाव देणार