एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंचा ‘हा’ निर्णय केला रद्द

मुंबई | एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांच्या मोठ्या गटासह बंड पुकारत शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडवून दिली.  एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसोबत सध्या गुवाहाटी येथे असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

नाराज एकनाथ शिंदेंची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर व रविंद्र फाटक सुरत येथे पोहोचले होते मात्र त्यांच्या प्रयत्नांना कोणतेही यश आले नाही. एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांना मध्यरात्री सुरत येथून गुवाहाटीला एअरलिफ्ट करण्यात आलं.

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनाही आक्रमक झालेली पाहायला मिळाली. सर्व आमदार 5 वाजेपर्यंत मुंबईला परत आले नाहीत तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी असणारे सुनील प्रभू यांची सही असणारे आदेश सर्व आमदारांना मेल करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत सुनील प्रभूंचीच उचलबांगडी केल्याचं जाहीर केलं आहे.

एकनाथ शिंदेंनी ट्विट करत शिवसेनेचा मुख्य प्रतोदचं बदलला आहे. एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबाबत काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं ट्विट करत सुनील प्रभूंची मुख्य प्रतोदपदावरून उचलबांगडी केली आहे. तर शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याची घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द केल्याने मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“…तर काेणीच मुख्यमंत्री बनणार नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”

‘संध्याकाळी 5 पर्यंत मुंबईत या, अन्यथा…’; बंडखोर आमदारांना शिवसेनेचा इशारा

“शिवसैनिकांनो काळजी करू नका, हा बाळासाहेबांचा जिगरी दोस्त अजून म्हातारा झाला नाही”

‘त्या’ दिवशी नेमकं असं काय झालं की शिंदेंनी डायरेक्ट सूरत गाठलं?, खरं कारण आलं समोर

‘या’ आमदारानं उद्धव ठाकरेंना आधीच अलर्ट दिला होता!, आता तोही आमदार या फोटोत