एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांवर पलटवार, म्हणाले…

मुंबई | शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या या वक्तव्याला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो. घटनेच्या 1 व्या परिशिष्टाप्रमाणे व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि शिवसैनिक आहोत, असंही ते म्हणाले.

असल्या धमक्यांना भीक घालत नाही कायदा आम्ही पण जाणतो. तुम्ही संख्याबळ नसताना अवैध गट तयार केला म्हणून आम्हीच तुमच्यावर कारवाईची मागणी करतो, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना आमदारांना राज्यात तर यावे लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निर्णय हा अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असं पवारांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमागे भाजपच, अजित पवारांना माहिती नाही” 

‘का उगाच वणवण भटकताय, चर्चा होऊ शकते’; बंडखोर आमदारांसाठी संजय राऊतांचं ट्विट

‘एकदा तरी चर्चा करायला हवी होती’, राऊतांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची नाराजी?

‘आता माघारी जाण्याचा प्रश्नच नाही’, राऊतांच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

राज्यातील सरकारबाबत नाशिकच्या अनिकेत शास्त्री यांचा सर्वात मोठा दावा, म्हणाले…