‘त्या’ निर्णयावर एकनाथ शिंदे संतापले; आता थेट उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

मुंबई | शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या एका गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचं पटलं नसल्याचंही स्पष्ट होतंय.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यामध्ये शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली असल्याची माहिती आहे.

शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारीच एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवलं आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर एकनाथ शिंदे संतापले आहे.

एकनाथ शिंदे यांनी काल सोमवारी सूरत गाठल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुपारी बोलवलेल्या बैठकीत शिंदे यांना गटनेतेपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. शिंदेच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती.

जो गटनेता निवडला गेला आहे, तो बेकायदेशीर आहे. सर्व आमदारांना एकत्र बैठक घेऊन एकमताने गटनेता निवडायचा असतो ही पद्धत आहे. बहुमताचा आकडा जो आहे, तो आमच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांची निवड ही अवैध ठरू शकते, हा तांत्रिक मुद्दा आहे, असं म्हणत शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. आम्ही कुणावरही टिका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार सोबत आले आहे. कुणाबद्दलही काही बोललो नाही. विकासाचं राजकारण केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण 

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का; ‘शिवसेने’वर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व येणार? 

‘सामना’च्या अग्रलेखाची धार वाढली, पाहा नेमकं काय म्हटलंय… 

एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा दावा; शिवसेनेचं टेंशन आणखी वाढलं 

‘एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा’; बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल