शिवसेनाभवन बांधण्यावरुन शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा दणका

औरंगाबाद | एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत बंड केले आणि त्यानंतर त्यांनी मातोश्री बंगला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरेंसोबत असलेले नेते यांना वगळता शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीवर आपला दावा सांगितला.

प्रथम त्यांनी आपला गट म्हणजे खरी शिवसेना असे म्हंटले नंतर त्यांनी शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्या गटाला मिळावे यासाठी निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) धाव घेतली.

आता तर ते प्रति शिवसेनाभवन बांधण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी मुंबईत (Mumbai) दादर येथे जनतेच्या प्रश्न आणि चर्चेसाठी शिंदे गटाचे एक मध्यवर्ती कार्यालय बांधण्याचे योजिले आहे.

तर औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात देखील ते कार्यालय बांधण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी कार्यालयाकरीता जागा शोधण्याचे काम सुरु केले आहे. मानखुर्दला (Mankhurd, Navi Mumbai) त्यांच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन देखील झाले आहे.

दादर नंतर औरंगाबाद शहरात देखील शिंदे गटाचे एक मध्यवर्ती कार्यालय स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) यांनी दिली आहे.

एकदा काय जागा नक्की झाली की, लागलीच कार्यालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच शिंदे गटाच्या अनेक शाखा देखील उभारण्याचे काम सुरु केले जाणार आहे.

मुंबई नंतर औरंगाबाद शहरावर शिवसेनेची पकड आहे. तसेच औरंगाबादचे नामांतर आता संभाजी नगर (Sambhaji Nagar) करणाची देखील खटपट चालू असल्याने, ह्या महत्वाच्या शहरात देखील शिंदे गट आाता सक्रिय होऊ पाहत आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“त्या दिवशी हे सरकार कोसळेल”, अजित पवारांची संख्याबळाच्या मुद्यावर भविष्यवाणी

शिंदे गटाची पहिली शाखा उघडली, खासदारांच्या हस्ते उद्घाटन

“सरकारी नोकरीसाठी मुलींना कुणाच्यातरी सोबत झोपावे लागते, तर मुलांना…” काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य….

प्रति शिवसेनाभवन बांधण्यावरुन उदय सामंतांचे स्पष्टीकरण

शिंदे आणि फडणवीस यांनी एक शब्द फेमस केला आहे, तो म्हणजे… – अजित पवार