मुंबई | गोरेगाव येथील कथित पत्राचाळ भूखंड गैरव्यवहाराचे आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आहेत. त्या आरोपांत ते सध्या ईडीच्या (सक्तवसुली संचलनालय) ताब्यात आहेत.
या प्रकरणाचे धागेदोरे थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापर्यंत जातात, असा दावा भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी पवारांच्या चौकशीची मागणी केली आहे.
भातखळकरांनी पवारांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी व्हावी, म्हणून गृहखात्याला एक पत्र पाठवत विनंती केली आहे. त्यांच्या पक्षातील आमदारांनी प्रदेशाध्यक्षांनी त्यांची पाठराखण केली आहे.
आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सध्या जळगाव दौऱ्यावर असलेल्या मुख्यंमत्र्यांनी या प्रकरणी पत्रकारांसोबत संवाद साधताना भाष्य केले आहे.
पत्राचाळ प्रकरणी शरद पवार यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या चौकशीची भाजपकडून मागणी केली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी शिंद्यांनी विचारला असता, ते म्हणाले, मी त्या प्रकरणाची माहिती घेतो.
मला अगोदर माहिती घेऊ द्या, त्यानंतर मी या प्रकरणावर बोलणे योग्य होणार आहे, अश्या मोजक्या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी जास्त काही बोलण्याचे टाळले आहे.
महत्वाच्या बातम्या –
पत्राचाळ घोटाळ्याचे धागेदोरे शरद पवारांपर्यंत? भातखळकरांची चौकशीची मागणी
रामदास कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणी दाढी…”
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मनसेची शिवसेनेवर मोठी टीका; “शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर जनता…”
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस…