मुंबई | गणपती उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज झाले आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यासंदर्भात विशेष निर्णय घेतले आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना टोलमाफी केली आहे. तसेच विशेष बस गाड्या आणि रेल्वे देखील सोडल्या आहेत. आता मुंबई पुणे महामार्गावर देखील विशेष सूट देण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांसाठी मुंबई पुणे (Mumbai Pune Express Way) महामार्गावर टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री रविवारी साताऱ्यातून परतत असताना त्यांनी पुण्यातील चांदणी चौक (Chandani Chowk) परिसरात पाहणी केली. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीची पाहणी केली आणि वाहतूक कोंडी टाळण्याचे निर्देश दिले.
सण आणि उत्सवांच्या दिवसांत द्रुतगती मार्गावरील कोंडी टाळण्यासाठी पथपर नाक्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करावी आदी आदेश शिंदे यांनी दिले.
गणेशोत्सव, शनिवार आणि रविवार या दिवसांत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोल नाक्यांवरील ट्रॅफिक वार्डन, टोल वसुलीसाठी वापरण्यात येणारी स्कॅनिंग मशिन्सची संख्या वाढविण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या –
“आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे!” – मनसेचे संदीप देशपांडे
वैज्ञानिकांना लागला दुसऱ्या पृथ्वीचा शोध?
देवेंद्र फडणवीसांच्या “विनाशकाले विपरीत बुद्धिला” आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले…
‘संभाजीराजेंचं नेतृत्व नको’; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
मोठी बातमी! पाकिस्तानने जाहीर केली राष्ट्रीय आणीबाणी; तीस लाख लोक बेघर