गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

पुणे | न्यायालय आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन यंदाचे गणेशोत्सव (Ganpati Festival 2022) धुमधड्याकात साजरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. गणपती उत्सवात मंडळांना कोणतीही अडचण येणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

गणपती उत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीवर्धकांना (Loud Speaker, DJ) परवानगी देण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणपती मंडळांची बैठक झाली. यात त्यांनी सदर घोषणा केली.

जय गणेश व्यासपीठाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पोलीस आयुक्त (Police Commissioner of Pune) अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta), पोलीस सहआयुक्त (Joint-Commissioner of Police) संदीप कर्णिक (Sandeep Karnik) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते. शिंदे यांनी यावेळी गणेशोत्सव मंडळांना सूचना दिल्या.

पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना ऐतिहासिक वारसा आहे. राज्यभरातून अनेकजण पुण्यातील गणपती उत्सव (Pune Ganesh Festival) पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे आम्ही विशेष काळजी घेणार असल्याचे शिंदे यांनी मंडळांना आश्वासित केले.

या वर्षी कोणत्याही मंडळाला कोणतीही अडचण येणार नाही. जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील. तसेच नियमांचे काटेकोर पालन करुन विसर्जन मिरवणुका काढल्या जाव्यात, असे शिंदे यांनी सांगितले.

गणपती मंडळे सामाजिक कार्ये करत असतात. त्यामुळे त्यांना परवानग्या दिल्या आहेत. दहिहंडीला देखील परवानगी दिली आहे, असे शिंदे यांनी नमुद केले.

महत्वाच्या बातम्या – 

“म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा अशी महाविकास आघाडीची अवस्था “

‘दगड मारुन पळून जाण्यात मर्दुमकी नाही’, सामंतांवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे संतापले

‘भाजपचा वंश कोणता? सगळे रेडीमेड आणि हायब्रीड’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी उद्यावर, जाणून घ्या आज न्यायालयात काय घडले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आमटेंची भेट, पाहा फोटो