शिंदेंच्या निर्णयावर अपक्षांची नाराजी?, मंत्रिमंडळ विस्तारानंतर म्हणाले…

मुंबई | गेले अनेक दिवस प्रलंबित असलेला आणि चर्चेचा विषय बनलेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला.  पहिल्या टप्प्यात शिंदे यांच्या 9 तर भाजपच्या देखील नऊ नेत्यांनी शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या आमदारांना यावेळी मंत्रिपदे मिळाली आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील आपले मंत्रिपद दावावर लाऊन बाहेर पडलेल्या आमदारांना शिंदे यांनी प्रथम फेरीत पसंती दिली.

शिवसेनेच्या चाळीस आमदारांसोबत बंडात अपक्ष आमदारांचा देखील सहभाग होता. अपक्ष आमदारांनी देखील बंडात महत्वाची भूमिका बजावली होती. ते देखील गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे सुरुवातीला आम्ही मंत्रिपदासाठी बंड केले नाही म्हणणाऱ्या आमदारांना देखील आता मंत्रिपदाची आस लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी या मंत्रिमंडळात महिलांना डावललं गेल्याचा आरोप केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही दुसऱ्या फेरीत महिलांना संधी देऊ, असे ते म्हणाले.

अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी यावर नाराजी व्यक्त केली. परंतु आम्ही वरिष्ठांसोबत बोललो असून, दुसऱ्या टप्प्यातील विस्तारात मित्र पक्षांना संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आता शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी कोणीही नाराज नाही, असे म्हंटले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात बाकीच्या आमदारांना संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले.

पहिल्या टप्पात संधी न मिळाल्याने भाजप शिवसेनेसोबत अनेक अपक्ष आमदार नाराज असल्याचे कळते आहे. परंतु आता बड्या नेत्यांनी त्यांना अभय दिल्याने सर्व काही शांत आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! बिहारमध्ये नितीश कुमारांचा भाजपला जोर का झटका

नव्या मंत्रिमंडळात सगळेच्या सगळे कोट्यधीश; जाणून घ्या कोणाची किती संपत्ती?

वादग्रस्त आणि आरोप झालेले ‘हे’ मंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळात

‘हे अत्यंत दुर्देवी’, संजय राठोडांना मंत्रिपद मिळताच चित्रा वाघ संतापल्या

शरद पवार, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांनाही सर्वोच्च न्यायालयाचा दणका