मुंबई | एकनाथ शिंदे यांनी 2014 आणि 2019 साली निवडणुकीचा अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वाहने, मालमत्ता आणि शैक्षणिक माहितीमध्ये तफावत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी 1019 मधील निवडणुकीत आपल्याकडील वाहनांची किंमत घटवून सांगितली. तसेच शेतजमीन असल्याची बाबही लपवून ठेवली, असे आरोप याचिकेतून करण्यात आले आहेत.
2014 च्या निवडणूक शपथपत्रात शिंदे यांनी स्कॉर्पिओ 11 लाख रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे. मात्र, 2019च्या शपथपत्रामध्ये तीच गाडी अवघ्या लाख 33 हजार रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे.
2014 च्या शपथपत्रात बोलेरो 6 लाख 96 हजार 370रुपयांना, तर तीच गाडी 2019 च्या शपथपत्रात लाख 89 हजार 750 रुपयांना खरेदी केल्याचं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या अडचणी आता वाढवण्याची शक्यता आहे. कारण, पुण्यातील प्रथमवर्ग न्यायालयात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”
महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात अखेर भाजपची उडी, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला
‘तुमचे पुत्र, प्रवक्त्यांनी बाप काढायचा आणि तुम्ही समेटाची हाक द्यायची’, शिंदेंचा घणाघात