बंड मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ठेवल्या ‘या’ अटी!

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांच्या मोठ्या गटासह बंड पुकारला. यानंतर शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली.

एकनाथ शिंदे गेल्या शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. अखेर एकनाथ शिंदे व शिवसेनेतील खदखद आता पडली असून शिंदेंनी त्यांच्या सहकारी आमदारांसह बंड पुकारला.

यापुढे काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ नाही म्हणजे नाही, असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला आहे. इतकंच नाही तर बंड मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसमोर आणखी दोन प्रस्ताव ठेवले असल्याचं म्हटलंं जात आहे.

भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व मी उपमुख्यमंत्री होईल, असंही शिंदे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव शिवसेना मान्य करणार की राज्यात नवं राजकीय नाट्य पाहायला मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे सुरूवातीपासूनच राष्ट्रवादीवर नाराज होते. त्यात शिवसेना व भाजपची युती व्हावी असं एकनाथ शिंदेंचं सुरूवातीपासूनच मत होतं.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही, कारण सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय” 

Eknath Shinde | भाजपने एकनाथ शिंदेंना दिली ‘ही’ मोठी ऑफर? 

शिवसेनापाठोपाठ काँग्रेसमध्येही भूकंप होण्याची शक्यता! 

“संध्याकाळी आम्ही जेव्हा पक्ष कार्यालयात जमलो तेव्हा….”; शिवसेना नेत्याने सांगितलं नेमकं काय झालं? 

मोठी बातमी! 11 आमदारांसह नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे अखेर गुजरातमध्ये सापडले