मुंबई | राज्यातील दोन मंत्र्यांचे कॅबिनेट काल (दि. 1) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना भेटायला त्यांच्या दादर येथील निवासस्थानी गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी भागवतांना भेटले.
ही सदिच्छा भेट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावेळी दोनही मंत्र्यांनी भागवतांसोबत जवळजवळ पाऊन तास चर्चा केली.
या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधत या भेटीत काय घडलं याची माहिती दिली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ही सदिच्छा भेट होती. त्यात कोणतेही विशेष औचित्य नव्हते. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची योगायोगाने भेट झाली. त्यानंतर आम्ही सहज भागवतांना भेटण्याचे ठरवलं आणि रवाना झालो.
मोहन भागवत मला आदर्श आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा ती साधण्याचा माझा प्रयत्न असतो. यापूर्वी मी ठाण्यातील एका कार्यक्रमात त्यांना भेटलो होतो, असं शिंदे यांनी पत्रकारांना सांगितलं.
उपमुख्यमंत्री या भेटीबद्दल म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सरसंघचालकाची भेट घ्यायची होती. त्यानुसार आज त्यांनी वेळ घेतली. भागवत आज योगायोगाने मुंबईत होते आणि म्हणून आम्ही सहज त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचा आशिर्वाद घेतला.
आमच्या युतीत 100% हिंदुत्व हा मुद्दा आहेच. सरसंघचालकांनी आम्हाला एवढेच सांगितले की मन लावून चांगले काम करा, सचोटीने काम करा, एकमेकांना सोबत घेऊन काम करा. तसेच हिंदुत्व हा आपला अजेंडा आहेच, असे यावेळी फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
‘लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश दिलाय’, अभिनेता सुबोध भावेचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ
‘शरद पवारांचा खाकस्पर्श’, भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चांना उधाण
‘चाळीसच्या चाळीस आमदारांनी राजीनामा द्या, मग बघू…’, आदित्य ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आव्हान
फक्त पत्राचाळच नाही तर ‘या’ घोटाळ्यातही संजय राऊतांचं नाव, ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर