मुंबई | महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरलेली असतानाच शिवसेनेचे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. नॉट रिचेबल असलेले सर्व आमदार हे शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असल्याचं सांगण्यात येत आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याचं बोलेलं जात आहे.
गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं समोर आलं आहे.
सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचंही समोर आलं आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत सचिन अहिर व आमश्या पडवी हे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले खरे पण पक्षाचे 55 आमदार असताना या दोघांना पहिल्या पसंतीची 52 मते मिळाल्याने शिवसेनेची तीन मते फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही सिंह निवडून आले पण गडाला मात्र खिंडार पडले अशी अवस्था झालीये.
याशिवाय सेनेच्या सहयोगी आमदारांच्या मतांचं काय असा प्रश्नही निर्माण झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार”
मोठी बातमी! परमबीर सिंग यांचा सीबीआयला दिलेल्या जबाबात अत्यंत खळबळजनक दावा
विधानपरिषदेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मोठी बातमी! शिवसेना राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी, भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर
सोनिया गांधींना रूग्णालयातून डिस्चार्ज, ‘या’ तारखेला ईडीसमोर हजेरी लावणार