मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत आपल्या गोटातील 40 पेक्षा जास्त आमदार लांबविले. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) सरकार कोसळले.

सरकार पाडल्यावर त्यांनी भाजपसोबत (BJP) युती करत सरकार स्थापन केले आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

पुढील कार्यक्रम आणि खातेवाटपासाठी त्यांनी जोडीने, तर कधी एकट्याने दिल्ली दौरे केले. परंतु ते निष्फळ ठरले. म्हणून अद्याप शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यावरुन विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करत आहे.

सततच्या दौऱ्याने आणि धाकधूकीने मुख्यमंत्री आता आजारी पडले आहेत. डॉक्टरांनी त्यांना सक्त आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस मंत्रिमंडळाचे कामकाज ठप्प झाले होते.

यावर आता त्यांनीच तोडगा काढला आहे. सर्व विभाग आणि खात्यांच्या सचिवांना (Secretary) त्यांच्या विभागातील निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यांनी काल (दि. 05 ऑगस्ट) रोजी घरुनच हा निर्णय घेतला.

शिंदे गटातील खुद्द एकनाथ शिंदे यांच्यासह इतर 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि निवडणूक आयोगाची भूमिका यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची अनेक कारणे आहेत. शिवसेनेतील आपले अस्तित्व पणाला लाऊन शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांना मंत्रिपदाची आशा आहे. तर 105 आमदारांचा पक्ष असलेल्या भाजपलासुद्धा मंत्रिपदे हवी आहेत. त्यामुळे त्यांच्यात कोणत्याही निर्णयावर शिक्कामोर्तब होत नाही आहे.

महत्वाच्या बातम्या – 

ICICI आणि PNB बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

मोठी बातमी! शरद पवारांपाठोपाठ अजित पवारांनाही धक्का

शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी!

“मुख्यमंत्री अनेक दिवस नीट झोपलेले नाहीत, ते रात्री…”

गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, उचललं मोठं पाऊल