Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

’24 तासांत मी तुमच्यासाठी वाईट झालो का?’, एकनाथ शिंदेंचा सवाल

eknath shinde e1655821280526

मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. एकनाथ खडसेंनी 35 समर्थक आमदारांसोबत बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला.

एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर शिवसेना देखील आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदेंची गटनेतेपदावरूनही हाकालपट्टी केली.

शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर व रविंद्र फाटक यांनी सुरत येथे जात एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरेंशी फोनवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

यावेळी बोलताना मी 24 तासांत तुमच्यासाठी एवढा वाईट झालो का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केल्याने राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या राजकीय घडामोडींना पुढे काय वळण लागणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे व मिलिंद नार्वेकर यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेणार हे बघण्यासारखं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

“21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?”, मनसेचा टोला

मोठी बातमी! एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार

‘शिवसेनेच्या आमदारांना किडनॅप करून नेलं’, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

बंड मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ठेवल्या ‘या’ अटी!

‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत’, एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट