मुंबई | शिवसेना विरूद्ध शिंदे गट वाद दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंचं बंड ते महाराष्ट्रातील सत्तापालट यामुळे काही दिवसांपूर्वी जवळचे सहकारी असणारे आता पक्के राजकीय वैरी झाले आहे.
भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदेंनी सरकार स्थापन केलं मात्र अनेक दिवस उलटूनही अद्याप नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यावरून आता विरोधकांनी नवनिर्वाचित शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर सडकून टीका गेली. गेले ते बंडखोर नाही तर हरामखोर आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
इतकंच नाही तर हिंमत असेल माझ्या बापाचं नाव न लावता लढा, असा इशाराही ठाकरेंनी शिंदे गटाला दिला होता. तर एकनाथ शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप देखील अनेकदा शिवसेनेकडून झाला आहे.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करू नये, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला आहे.
बाळासाहेब आम्हाला वडिलांप्रमाणे होते. त्यांच्या आशीर्वादानेच हे सरकार स्थापन झालं. जे अडीच वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं त्याची दुरूस्ती आम्ही करत आहोत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकल्यांनी खंजीराची भाषा करू नये असं म्हणताना पाठीत खंजीर कोणी खुपसला हे मी योग्य वेळी सांगेन, असा थेट इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘गेले ते बंडखोर नाही तर हरामखोर’, उद्धव ठाकरे बंडखोरांवर बरसले
‘मनसे म्हणजे एक आमदाराची अगरबत्ती’, भोगामंत्री म्हणत दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं
“राऊतांना आता तरी समज आली पाहिजे, त्यांनी पक्षाची काय अवस्था करून टाकलीये”
रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंची पूनम पांडेकडून प्रशंसा, म्हणाली…
“शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही”