टेबलावर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं, म्हणाले…

मुंबई | एकनाथ शिंदे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. त्यानंतर गोव्यातील हॉटेलच्या लॉबीमध्ये जमलेल्या आमदारांनी एकच जल्लोष केला.

काही आमदारांनी आनंदाच्या भरात टेबलावर चढून जोरदार डान्स केला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर टीका केली होती.

मुंबईत झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर शिंदे शुक्रवारी पहाटे दोना पावला येथील हॉटेलमध्ये परतले. यावेळी समर्थक आमदारांना संबोधित करताना त्यांनी त्यांच्या नृत्यावर तीव्र आक्षेप नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी घेण्यास सांगितलं आहे.

नागरिकांनी निवडून दिलेल्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या आमदारांना हे शोभत नाही. आनंदाच्या भरात अशा चुका होतात, असं दीपक केसरकर म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात जवळपास 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

उपमुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल! 

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी 

“मी अजूनही बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि शिवसेनेचा आमदार” 

शिंदे सरकारची 4 तारखेला बहुमत चाचणी, मुख्यमंत्री म्हणतात…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय