नाशिक महाराष्ट्र

“काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात; लवकरच पक्षात प्रवेश करतील”

नाशिक |  आघाडीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा वारंवार भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील करत आहेत. मात्र आता शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहे. लवकरच ते पक्षात प्रवेश करतील, असा दावा केला आहे.

लोकसभेच्या तोंडावर अनेक काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजप-सेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार याच आठवड्यात पक्षाला सोडचिठ्ठी देत राजीनामा देतील, असा दावा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यांचीच री आता शिंदेंनी ओढली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र चंद्रकांत पाटील यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. चंद्रकांत दादांना काहीही बोलायची सवय झाली आहे. शेवटी स्वभावाला औषध नसतं. खरंच जर काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार भाजप-सेनेच्या संपर्कात आहेत तर संबंधित नेत्यांनी त्यांची नावे जाहीर करावी, असं आव्हानही अजित पवार यांनी दिलं आहे.

गेल्याच आठवड्याच पवार कुटुंबांशी पहिल्यापासून जवळचे संबंध असलेले राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा सेनाप्रवेश राष्ट्रवादीसाठी धक्कादायक होता.

दरम्यान, एकनाश शिंदेंच्या वक्तव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“अजित पवार यांना माझं कालही आव्हान होतं… आजही आहे… अन् उद्याही राहणार”

अजित पवार घरभेदी; स्वतःच्या दिवट्यासाठी पवार साहेबांनाही अव्हेरलं!

-भाषणादरम्यान शेतकरी ओरडला गावात दवाखाना नाही; लगोलग आदित्य ठाकरे म्हणाले…

पक्षांतराच्या काळात राष्ट्रवादीचा आमदार म्हणतो; माझे तत्व एकच ‘पवार एके पवार…’

विश्वविजयानंतरही इंग्लंडचा कर्णधार नाराज; म्हणतो…

IMPIMP