एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई | राज्याचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

भाजपने पाठिंबा देऊन शिवसेनेचे बंडखोर आमदारांना पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले नेते उपमुख्यमंत्री झाले आहेत.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून सातत्याने दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या उच्चार केला आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून शेवटपर्यंत सेनेतच राहणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोठ्या मनाचा माणूस मिळणं कठीण” 

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट, म्हणाले… 

“सध्या लगोलग सगळ्यांना मंत्रिपद देणं शक्य होणार नाही, त्यामुळे…”