संजय राऊतांच्या अटकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | पत्राचाळ घोटाळा आणि पैशांची अफरातफरप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना रविवारी (दि. 31 जुलै) रोजी 18 तासाच्या दीर्घ चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate)ताब्यात घेतले.

त्यावर शिवसेनेचे बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला सुद्धा शिवसेनेने तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, असे शिंदे म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी आमची बदनामी देखील केल्याचे त्यांनी म्हंटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. यावेळी ते प्रसार माध्यामांशी संवाद साधताना म्हणाले, ते बऱ्याच जणांना तुरूंगात टाकण्यासाठी निघाले होते. त्यांनी आमची बदनामी देखील केली. पण आम्ही हे सर्व विसरुन गेलो आहोत.

सक्तवसुली संचलनालयाच्या भीतीने कुणीही आमच्यासोबत किंवा भाजपमध्ये येण्याचे पुण्यकाम करु नका, कर नाही तर डर कशाला, असे म्हणत संजय राऊतांना शिंदेंनी टोला लगावला.

ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून आमदार आणि नेत्यांना भाजपात भरती केले जात आहे, असे विचारल्यावर शिंदे म्हणाले, आम्ही राऊतांना भाजपमध्ये बोलावलं नाही.

संजय राऊतांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यात त्यांचा दोष असेल की नाही हे लवकरच कळेल. त्यांनी काही केले नसेल तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही. राऊत स्वत:च ‘कर नाही तर डर कशाला’, असे म्हणायचे, अशी शिंदे यांनी त्यांना आठवण करुन दिली.

संजय राऊत हे महाविकास आघाडी सरकारचे (MVA) मोठे नेते होते. त्यांना प्रसारमाध्यमं रोज सकाळी टिव्हीवर दाखवत होती. पण आम्ही सुडाचे राजकारण करत नाही. त्यामुळे चौकशी हा स्वतंत्र विषय आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी पुढे बोलताना शिंदे म्हणाले, कोणाच्या मागे जर कोणतीही चौकशी किंवा कारवाई लागली असेल तर त्यांनी आमच्याकडे येऊ नका. आम्ही कोणावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही. कोणालाही दबावाने पक्षात घेतले नाही.

महत्वाच्या बातम्या –

एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

‘हे काही शहाणपणाचं नाही’, राज्यपालांविरोधात शरद पवार आक्रमक

राज्यापालांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रकाश आंबेडकरांचं समर्थन, म्हणाले…

‘दरवेळी उपलब्ध असलेले फडणवीस आता कुठे गेले?’, सुप्रिया सुळेंची टोलेबाजी

‘कोश्यारींची होशियारी’, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज ठाकरेंनी झापलं