सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी होणार?

मुंबई | गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय नाट्य सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत.

महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

यानंतर बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. मुंबईतील शिवसेना (Shivsena) भवनात आज दुपारी एक वाजता ही बैठक होणार आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राजकीय हालचालींना वेग आलेला असताना एकनाथ शिंदेंची पक्षाच्या नेतेपदावरून हाकालपट्टी होणार असल्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या नेतेपदावरून हाकालपट्टी झाली तर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या जास्त असल्याने शिवसेनेसा पडलेलं भगदाड दिवसेंदिवस वाढत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमागे भाजपचाच हात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंकडूनही करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता काय वळण लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल 

मोठी बातमी! शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई

सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय! गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट

‘स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय’, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल