मोठी बातमी! एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार

मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. शिंदेंनी 35 समर्थक आमदारांसोबत पक्षाविरोधात बंड पुकारत सुरत गाठलं.

एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनाही एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदेंची गटनेतेपदावरून हाकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसोबत सुरत येथील ले मेरेडियन हॉटेलमध्ये आहेत. त्यात सुरतमधून सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे.

एकनाथ शिंदे संध्याकाळी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे. राजकारणातील सकाळपासूनच्या घडामोडी बघता राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिंदेंच्या भूमिकेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अहमदाबाद येथे एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करू शकतात.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडींना काय वळण लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘शिवसेनेच्या आमदारांना किडनॅप करून नेलं’, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

बंड मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ठेवल्या ‘या’ अटी!

‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत’, एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट

“महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही, कारण सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय”

Eknath Shinde | भाजपने एकनाथ शिंदेंना दिली ‘ही’ मोठी ऑफर?