एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं; शिंदेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड, शिवसेनेची वाताहात आणि शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सुरु असलेला वाद जगजाहीर आहे. शिवसेना आणि शिंदे गटाची शाब्दिक लढाई गेले कित्येक दिवस सुरु आहे.

शिवसेना शिंदे गटाला गद्दार म्हणत आहे, तर शिंदे गट स्वत: ला शिवसेना (Shivsena) म्हणवून घेत आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता पुन्हा चिघळणार आहे, असे चित्र सध्या दिसत आहे.

त्याचे कारण एकनाथ शिंदे यांचे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतरचे ट्विट. या ट्विटमध्ये शिंदे म्हणतात, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजप युुती सरकारला जनतेचा कौल…

तसेच ते पुढे लिहितात, शिवसेना-भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार.

त्यांनी सोबत एक फोटो टाकला आहे. त्यात त्यांनी आपल्या 40 आमदारांच्या गटाला शिवसेना असे म्हंटले आहे. तर शिवसेनेला म्हणजे उर्वरीत 27 आमदारांच्या गटाला ते उद्धव ठाकरे गट म्हणाले आहेत.

त्यामुळे आता शिवसेना आणि शिंदे गट वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार आहेत. ह्या ट्विटमधून एकनाथ शिंदे काय सूचित करु इच्छितात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्न सध्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दरबारी प्रलंबित असताना, एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला शिवसेना संबोधून पुन्हा शिस्तभंग केली असल्याने शिवसेना आता त्यांना काय प्रत्युत्तर देणार, याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

“अमित शहांमध्ये मला सरदार वल्लभभाई पटेलांचं प्रतिबिंब दिसतं”

नरेंद्र मोदींमुळे भारतीयांचा देशात गौरव झाला- भगतसिंह कोश्यारी

कोणत्याही निवडणूका लागल्या की मला बोलवा – अमित ठाकरे

ICICI आणि PNB बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!