मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राजकारण म्हटलं की आरोप-प्रत्यारोप हे नेहमीच सुरु असलेले पहायला मिळतात. त्यामुळे राजकीय वर्तुळात नेहमीच खळबळ असलेली पहायला मिळते.

नुकतंच काही दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशन पार पडलं. मात्र या हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सध्या मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्यावर अनेक टीकांचा भडीमार होत असलेला पहायला मिळचत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांच्यावर नुकतीचं मणक्याची शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ते हिवाळी अधिवेशनालाही उपस्थित राहू शकले नाहीत.

यंदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत पार पडलं. मात्र हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सभागृहात उपस्थित नसल्यानं त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावरुन त्यांच्यावर टीकांचा भडीमार होत आहे. असं असतानाच आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री महोदय व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अनेक बैठका घेतल्या. ते राज्याचा कारभार व्यवस्थितपणे सांभाळत आहे. कोविडच्या लढाईत देखील त्यांनी अनेक बैठका घेतल्या.

पुढे ते म्हणाले की, राज्यात अनेक वादळे आली त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. सरकारने शेतकऱ्यांच्या बाबत कधीही हात आखडता घेतला नाही. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनेक बैठकी घेतात कुठेही खंड पडत नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री आजारी असल्यानं राज्याचा कारभार सुरळीत चालला नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना लक्ष करत असतात.

ज्याचा कारभार चालवण्यासाठी कुणीतरी मुखिया हवा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आजारी आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे करी सोपवावी, असं म्हणत विरोधक सरकारवर ताशेरे ओढत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मित्रच ठरले यमदूत!, नांदेडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना

  “लॉकडाऊनचे चटके लोकांनी भोगलेत, मात्र…”; मोठा निर्णय होण्याची शक्यता

 नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट

WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…

“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”