मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढवल्याचं दिसतंय. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याच्या दिवशीच या खासदारांनी भेट घेतल्याचं आता समोर येत आहे.
शिवसेनेचे 11 खासदार अमित शहा यांच्या भेटीला आल्याची माहिती आहे. अमित शाह आणि या 11 खासदारांची तब्बल साडे पाच तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
अमित शहा यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती असून या पुढे काय करायचं, काय भूमिका घ्यायची यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या एका खासदाराने याबाबत माहिती दिली.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत काय रणनीती असावी, किंवा द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यासाठी लोकसभेत वेगळा गट तयार करुन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तशी मागणी करण्याविषयी यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसात देशात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या भाजपाकडून द्रौपदी मूर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
विरोधीपक्षाकडून यशवंत सिन्हा हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा द्यावा, अशी मागणी काही शिवसेना खासदारांनी केल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊतांनीही दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शनिवार-रविवार फिरायला बाहेर पडताय?, पुणेकरांनो या गोष्टीमुळे वाढेल तुमची डोकेदुखी!
हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्याला धोक्याचा इशारा; पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
“माझा राजीनामा माझ्या खिशात, दबावाखाली काम करणार नाही”; ‘या’ नेत्याचा मोदींना इशारा
जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; जिओकडून नव्या धमाकेदार प्लॅनची घोषणा
‘पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल…’; शरद पवारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला