‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत’, एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत चांगलीच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदारांच्या मोठ्या गटाला घेऊन बंड पुकारल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे

एकनाथ शिंदे विधानपरिषदेच्या निकालानंतरच नॉट रिचेबल होते. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 11 नाहीतर 25 आमदारांसोबत सुरत येथे गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली असल्याचं समोर आलं.

बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच समोर येत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी एक बोलकं ट्विट केलं असून या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्याचं एकनाथ शिंदे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तर बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिल्याचंही शिंदे म्हणाले आहेत.

बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणारही नाही, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी हे ट्विटच नाही तर त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शिवसेनेचं नाव देखील काढून टाकलं आहे. त्यामुळे मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

“महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही, कारण सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय”

Eknath Shinde | भाजपने एकनाथ शिंदेंना दिली ‘ही’ मोठी ऑफर?

शिवसेनापाठोपाठ काँग्रेसमध्येही भूकंप होण्याची शक्यता!

शिवसेनेत मोठं वादळ?; एकनाथ शिंदेसोबत 11 नाहीतर ‘इतके’ आमदार हॉटेलमध्ये

“संध्याकाळी आम्ही जेव्हा पक्ष कार्यालयात जमलो तेव्हा….”; शिवसेना नेत्याने सांगितलं नेमकं काय झालं?