‘आमदार संपर्कात आहेत तर नावं सांगा’, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंडाळी केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

शिंदे गटाच्या बंडाळीमुळे राज्यासह देशातील वातावरण देखील ढवळून निघालं. शिंदे गटाविरोधात शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत असताना एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटातील आमदारांना जबरदस्ती गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंनी देखील केले. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना हे सर्व आरोप फेटाळून लावले असून उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.

आमचे प्रवक्ते दिपक केसरकर वेळोवेळी माध्यमांना माहिती देत आहेत. गुवाहाटीतील सर्व आमदार आनंदी आहेत, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.

बाहेरून काही लोक गुवाहाटीतील आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. मात्र, त्यांनी कोणते आमदार संपर्कात आहेत ते सांगावं मगच स्पष्ट होईल, असं आव्हान एकनाथ शिंदेंनी दिलं आहे.

आमदारांच्या संपर्कात आहोत म्हणणाऱ्यांनी नावं सांगावी, असं जाहीर आव्हान एकनाथ शिंदेंनी दिलं. तर गुवाहाटीत 50 आमदार असून ते आनंदी आहेत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, समोरचे लोक खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. इथे 50 आमदार असून ते त्यांच्या मर्जीने आले आहेत, असा खुलासाही शिंदेंनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आदित्यला आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न, पण कार्टुनमध्येही…’; निलेश राणेंचा टोला

‘आजचा शेवटचा दिवस असेल…’; बंडखोर आमदाराचा गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंना इशारा

“तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाही, मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही मग राज्य कोण चालवतंय?”

“येत्या दोन तीन दिवसात भाजपचं सरकार येईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”

मंत्र्यांची खाती काढल्यानंतर ठाकरे सरकारने उचललं आणखी एक मोठं पाऊल!