वेदांता फॉक्सकॉन गेल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधानांना फोन, म्हणाले…

मुंबई | फॉस्कॉन वेदांताचा (Foscon Vedanta) सेमीकंडक्टर बनविण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मागील काही महिने दौऱ्यांवर असताना, कंपनीच्या संचालकांनी हा प्रकल्प गुजरातला हलविण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी (दि. 13) रोजी पत्रकार परीषद घेत या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर विरोधी पक्षांकडून एकनाथ शिंदे आणि सरकारवर टीकेची झोड उठवली गेली.

पुण्याजवळील तळेगाव येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. यामुळे एक ते दीड लाख तरुणांना रोजगार मिळणार होता. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाच कसा, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या गुजरातेस जाण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचे म्हंटले आहे.

या टीकेची आणि प्रकरणाची दाहकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि. 13) रात्री फोन केला. त्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधत वेदांता ग्रुप आणि फॉस्कॉनच्या प्रकल्पाची चर्चा केली.

यावेळी त्यांनी आगामी काळात मोठे उद्योग आणि प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारची आम्हाला गरज आहे आणि त्यांचे सहाय्य आम्हाला लाभावे, अशी विनंती केली. या प्रकल्पाच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.

वेंदांता – फॉस्कॉनचा सेमी कंडक्टर बनविण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1.58 कोटी रुपयांची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता.

महत्वाच्या बातम्या – 

उत्तर प्रदेशात भाषणादरम्यान अमित शहांची जीभ घसरली, म्हणाले…

दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; खाद्यतेलांच्या किंमतीत घट, जाणून घ्या सविस्तर वृत्त

मविआचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शिंदे सरकारचा मोठा निर्णय; देशमुखांच्या अडचणी वाढल्या

बंगालमध्ये मोर्च्यादरम्यान भाजपचा मोठा हिंसाचार; पोलिसांचा बळाचा वापर

“ज्या मुलीने वयाच्या 13 व्या वर्षी घाण्यारड्या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळविली…” किशोरी पेडणेरकरांचा मोठा दावा