संजय राऊतांनी मानले निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारचे आभार!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 9 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रिय निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत.

राज्यावर जे अस्थिरतेचं संकट निर्माण झालं होतं ते आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने संपुष्टात येईल, अशी मला आशा आहे, असं संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे. केंद्र सरकार आणि आणि देशाच्या निवडणूक आयोगाचे मी आभार मानतो, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून राज्यात गेल्या 15 दिवसांत बरचंस राजकारण झालेलं पाहायला मिळालं. प्रथमत संजय राऊत यांनी थेट राजभवनावर टीकेचे बाण सोडले. तसंच राज्यपाल यामध्ये राजकारण करत असल्याचा आरोप केला. मात्र आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्यानंतर मागचं सगळं विसरून जाऊन कोरोनाला परतावून लावण्यासाठी आपण सगळे ताकदीने लढण्याची गरज असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  महाराष्ट्र दिनाला आज खूप गोड बातमी मिळाली आहे. आम्हाला या निर्णयाचं समाधान आहे. आता यावर कुणीही कोणतंही राजकारण करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आजच्या बैठकीतून महाराष्ट्राला राजकीय अस्थिरतेचा निकाल लागला असून आता महाविकास आघाडीवरचं संकट टळलं आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी काल केंद्राशी चर्चा करून निवडणूक घेण्यासंबंधी प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर आज केंद्रिय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला; महाराष्ट्र दिनाला महाविकास आघाडीला गोड बातमी!

-मुकेश अंबानी यांचा कर्मचाऱ्यांना झटका; घेतला हा निर्णय

-ऋषी कपूर यांच्या निधनानंतर केलेलं ट्विट अमिताभ बच्चन यांच्याकडून डिलीट!

-इरफान-ऋषींची एकापाठोपाठ एक एक्झिट; ‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम

-गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर