निवडणूक आयोगाचा शिवसेनेला मोठा दिलासा

नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेला मोठा दिलासा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षासंबंधी कागदपत्रे सादर करण्यासाठी आयोगाकडे मुदत मागितली होती.

त्याला निवडणूक आयोगान मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांचा जीव आता काही काळ भांड्यात पडला आहे. आयोगाकडे ठाकरेंनी (Udhhav Thackeray) चार आठवड्यांची मुदत मागितली आहे.

त्यामुळे शिवसेना पक्ष त्यांचाच आहे, असा दावा करण्यासाठी उपयुक्त कागदपत्रे त्यांना येत्या चार आठवड्यात सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत शिवसेनेतून चाळीस आमदार आणि बारा खासदार आपल्या गटात वळविले. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे आपला पक्ष म्हणजे खरी शिवसेना, असा दावा केला.

त्यामुळे हा मोठा पेच निर्माण झाला. होता. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे अनेक खटले सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) न्यायप्रविष्ठ आहेत. त्यावर सुनावणी प्रलंबित आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या गटाला देखील पक्ष त्यांचा असल्याची कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे दोघांचे वाद आयोगाच्या दरबारी आहेत.

दोनही गटांकडून कागदपत्रे सादर केल्यानंतर शिवसेना कोणाची आणि खरे शिवसैनिक कोण, हा निर्णय होणार आहे. त्यामुळे आगामी काळात या वादावर पडदा पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘कोण होतीस तू, काय झालीस…’; गाण्यातून किशोरी पेडणेकरांचा चित्रा वाघ यांना टोला

कुख्यात दहशतवादी संघटना ‘बोको हराम’च्या नावावरुन शिवसेनेने शिंदे गटाला दिले नवीन नाव

एकपात्री विनोदवीर मुनव्वर फारुकीच्या दिल्लीतील कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली; ठोस कारण…

“शिंदे गेले ते बरेच झाले, असंगाशी…”; उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेवर मोठी टीका

अनुपम खेर यांचे बॉलिवुडबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, दाक्षिणात्य चित्रपट कथेवर लक्ष केंद्रीत…